लेडी सिंघम शितल चाटे यांनी बेघरातील अनाथाना मिष्टान्न देऊन केला वाढदिवस साजरा!
सर्व स्तरातून शितलताई यांच्यावर
वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव!
बीड दि.२२( प्रतिनिधी)- बीड जिल्हा महसूल विभागातील अतिशय कर्तव्यदक्ष आणि कर्तृत्वान ज्यांची लेडी सिंघम म्हणून जिल्ह्यात ओळख निर्माण झाली. ज्यांनी आपल्या उत्कृष्ट महसूल प्रशासकीय कर्तुत्वाच्या कार्यातून सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक आगळे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या महसूल विभाग पालीच्या मंडळ निरीक्षक श्रीमती शितल चाटे मॅडम यांनी आपला स्वतःचा वाढदिवस हा कुठल्या मोठ्या एखाद्या हॉटेलमध्ये न करता किंवा कुठले मोठे फंक्शन न ठेवता त्यांनी अतिशय साध्या पद्धतीने बीड शहरांमधील नामांकित असलेले जिव्हाळा बेघर नवी भाजी मंडई येथे असलेले अनाथासोबत साजरा केला.
यावेळी त्यांनी जिव्हाळा बेघरातील अनाथ लोकांना मिस्टान्न देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. दुसरीकडे वाढदिवसानिमित्त शितल मॅडम यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ज्यांना घर नाही असे लोक ज्यांच्या घरी भांडण झालेले असतात त्यांना घरातून बाहेर काढलेले असते अशा लोकांना जिव्हाळा बेघर येथे जिव्हाळा बेघर चालवणारे राजू वंजारे सर अभिजीत वैद्य सर यांच्या माध्यमातून येथे या लोकांना निवासस्थान दिले जाते व त्यांची पूर्ण व्यवस्था जिव्हाळा या केंद्राच्या मार्फत केली जाते. या जिव्हाळा बेघराची माहिती श्रीमती शितलताई चाटे मंडळ निरीक्षक महसूल विभाग पाली यांनी होती. त्यामुळे त्यांनी आपला वाढदिवस मोठ्या पद्धतीने हॉटेल व इतर ठिकाणी साजरा न करता
जिव्हाळा बेघरातील आबालवृद्ध माता भगिनी यांच्या समवेत साजरा करण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी आपल्या वाढदिवसा दिवशी थेट जिव्हाळा बेघर गाठले. त्या ठिकाणी त्यांनी आपला वाढदिवस साध्या पद्धतीने परंतु मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी त्यांनी अनाथ माता माऊलींना आबाल वृद्धांना एक वेळेसचे मिष्टान्न भोजन देऊन त्यांची एक वेळेसची भूक भागवली. दुसरीकडे या बेघरातील अनाथांनी श्रीमती शितलताई यांना सर्वांनी भरभरून आशीर्वाद दिले व शुभेच्छा वाढदिवसानिमित्त दिल्या. पुढच्या वर्षी नायब तहसीलदार म्हणून आपण आपला वाढदिवस आमच्या समवेत साजरा करणार असा विश्वास व्यक्त करत शुभाशीर्वाद दिला. यावेळी शितलताई चाटे यांच्या मातोश्री आवर्जून उपस्थित होत्या. तसेच जिव्हाळा बेघरचे केंद्रप्रमुख राजू वंजारे सर, अभिजीत वैद्य सर तसेच लोकशाही पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष आत्मारामजी वाव्हळ सर तसेच संपूर्ण भारतामध्ये अन्यायाला वाचा फोडून न्याय देणारी संघटना म्हणजे ऑल इंडिया पॅंथर संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष मा नितीनजी सोनवणे साहेब तसेच लोकशाही पत्रकार संघाचे बीड जिल्हा संघटक तथा दैनिक न्याय टाइम्स तालुका प्रतिनिधी संजय देवा कुलकर्णी कुक्कडगावकर यांनी शितल चाटे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी शितल चाटे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.