06/09/25

*पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बीड तालुका काँग्रेस पक्षाकडून तीव्र निषेध* *मानवतेला काळीमा फासणारी घटना – गणेश बजगुडे पाटील*

*पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बीड तालुका काँग्रेस पक्षाकडून तीव्र निषेध*

*मानवतेला काळीमा फासणारी घटना – गणेश बजगुडे पाटील*

बीड दि.२५(प्रतिनिधी)-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बीड तालुका काँग्रेस व शिवक्रांती युवा परिषदेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत हा हल्ला अतिशय भ्याड व मानवतेला काळीमा फासणारा असुन हल्लेखोरांवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे नेते व शिवक्रांती युवा परिषदेचे संस्थापक अध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील यांनी केले आहे.
काश्मीर येथील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २७ निरपराध भारतीय पर्यटकांवर गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना अतिशय निंदनीय व मानवतेला काळीमा फासणारी असुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शहा यांनी यावर कठोरात कठोर भुमिका घेवुन ठोस उपाय योजना करायला हव्यात. जातीय धार्मिक तेढ निर्माण करून भ्याड हल्ले करणाऱ्यांवर सरकारने कारवाई तर करावीच परंतु देशाच्या सुरक्षिततेसाठी उपाय योजना देखील करायला हव्यात. या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या सर्व भारतीयांना बीड तालुका काँग्रेस कमिटी व शिवक्रांती युवा परिषदेच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ परमेश्वर देवो असेही गणेश बजगुडे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

 

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …