अंशतः अनुदानित शाळेच्या वाढीव टप्पा अनुदानासाठी थोरल्या पवारांचा शिक्षण मंत्र्यांना फोन!
मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्या सोबत बैठक लावा बैठकीसाठी मला बोलवा : शरद पवार
बीड दि.२३(प्रतिनिधी)- विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना
वाढीव टप्प्याचे अनुदानासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून द्या या मागणीसाठी
शि्षकांचे ५ जून पासून मुंबई शहरातील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू आहे. आज मंगळवार दिनांक 24 जून रोजी विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानावर काम करणाऱ्या शिक्षकांनी
थोरल्या पवारांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या यावेळी क्षणाचाही विलंब न करता शरदचंद्रजी पवार साहेबांनी थेट शिक्षण मंत्र्यांना फोन करून निधीची तरतूद करण्याच्या सूचना दिल्या.
अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढिसाठी आवश्यक असणारा
निधी मिळावा. या साठी विनाअनुदानित शाळेतीलज्ञशिक्षकांनी 5 जून पासून आझाद मैदानावरती आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन सुरू असताना या शिक्षकांच्या शिष्टमंडळने राज्यातील अनेक वजनदार राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन
निधी पदरात पाडून घेण्यासाठी धडपडत सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून आज मंगळवार दिनांक २४ रोजी विना अनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद
पवार गटाचे नेते श्री डॉ नरेंद्र काळे यांची भेट घेऊन थोरल्या पवार साहेबांची भेट घेण्याची व त्यांच्या कानावर हा प्रश्न टाकण्याची मागणी केली यावेळी डॉक्टर नरेंद्र काळे यांनी क्षणाचा ही विलंब न करता थोरले पवार साहेब यांची भेट घडवून आणली. या वेळी शिक्षण समन्वय संघाच्या वतीने शरदचंद्र पवार साहेब यांना निवेदन देऊन 14 ऑक्टोबर 2024 ला शासन निर्णय झाला पण, त्याची कोणतीही तरतूद केली नाही याची सविस्तर माहिती. शिवाय या वेळी 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आणून दिले व आजपर्यंत चा झालेला इतिवृतांत त्यांना सांगितला. तसेच 5 जून पासून आझाद मैदानावर विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांचे आंदोलन सुरू असल्याचे आदरणीय पवार साहेबांना सांगितले. यावेळी शरद पवार साहेब यांनी तात्काळ शालेय शिक्षण मंत्री श्री दादा भुसे यांना फोन करून टप्पा वाढीच्या निधी संदर्भात चर्चा केली. यावेळी पवार साहेबांनी शिक्षण मंत्री भुसे यांना टप्पावाडी संदर्भात जी आर काढला असेल तर याबाबत तरतूद करणे आवश्यक आहे. ही तरतूद आपण करावी असे सांगितले. याबाबत मुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्या सोबत चर्चा करायची असेल तर बैठक लावा या बैठकीसाठी मला बोलवा मी ही येतो, यावर चर्चा करून मार्ग काढू, आता शिष्टमंडळ पाठवत आहे त्यांच्या सोबत चर्चा करा, दादा भुसे साहेब यांना सांगितले. त्यानंतर हे शिस्टमंडळानी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची भेट घेतली. या वेळी ना. दादाजी भुसे यांनी शालेय शिक्षण विभाग टप्पा वाढीच्या निधी संदर्भात सकारात्मक असून याविषयीचे प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवले आहेत. आपल्या या प्रश्नावर खुद्द मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री हे सकारात्मक आहेत. हा प्रश्न तात्काळ निकाली काढायचा असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी या शिष्टमंडळाला सांगितले. या शिष्टमंडळात खंडेराव जगदाळे,सदानंद लोखंडे, मुक्ता आर्दड, संगीता राठोड, संदीप नरोटे, अमोल खरात, पुंडलिक रहाटे, वैजनाथ चाटे, अजय थूल, गजानन शिंगणे, संतोष पाटील, महेंद्र वाघमारे आदी बांधव उपस्थित होते.
________________________________