06/09/25

विद्यार्थींनींचा छळ करणाऱ्या पवार आणि खोटकरला लवकरात लवकर अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरणार – तेजस दुनघव

विद्यार्थींनींचा छळ करणाऱ्या पवार आणि खोटकरला लवकरात लवकर अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरणार – तेजस दुनघव

बीड दि.२९(प्रतिनिधी)-बीड शहरातील उमा करण कोचिंग क्लासेस मधील प्रा.विजय पवार व प्रशांत खाटोकर या दोघांनी क्लासेस मधीलच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्या दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल होताच ते दोघेही फरार झाले असून पोलिसांनी त्यांना
लवकरात लवकर अटक करा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवा कार्यकर्ते तेजस दुनघव यांनी दिला आहे.
बीड शहरातील उमा करण कोचिंग क्लासेस मधील प्रा.विजय पवार व प्रशांत खाटोकर या दोघांनी क्लासेस मधीलच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येताच
या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र शब्दात निषेध व्यक्त होत आहे. दरम्यान पालकांच्या व सामाजिक कार्यकर्त्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
बीड शहरातील धानोरा रोड परिसरातील युवा कार्यकर्ते तेजस दुनघव यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या त्या दोन्ही नराधम प्राध्यापकाना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई अन्यथा कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच युवा नेते तेजस दुनघव
यांनी त्या क्लास मधील इतर मुलीवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करत मुलींनी घाबरून न जाता पोलिस ठाण्यात तक्रार करावी असे आवाहन केले आहे. त्याच बरोबर त्यांनी इतर ठिकाणी कुठं ही मुलींना असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी
ताबडतोब पालकांना सांगावे असे आवाहन या वेळी दुनघव यांनी समस्त विद्यार्थ्यींनींना केले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …