संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पावनधाम दिंडीत मंत्री आशिष शेलार सहभागी
महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्याबरोबर घेतला फुगडीचा आनंद
बीड दि.५ (प्रतिनिधी)-संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पावनधाम दिंडीत राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सहभाग घेतला. मागच्या अनेक वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त विठोबाच्या भेटीस केज तालुक्यातील श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथील दिंडी आषाढी एकादशी निमित्त देहू ते पंढरपूर जाते. श्रीक्षेत्र प्रतिदेहू संत तुकोबाराय पावनधाम संस्थांचे संस्थापक अध्यक्ष ह. भ. प.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी निघते.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी संत तुकोबाराय पावनधामची दिंडी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाली. यावर्षी वारीचे वैशिष्ट्ये म्हणजे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी पावनधाम दिंडीत सहभाग घेतला. यावेळी महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्याबरोबर फुगडीचा आनंद घेतला. मंत्री महोदयांनी पावनधाम दिंडी मध्ये एक तास वारकरी बांधवांशी संवाद साधला. यावेळी गणेश महाराज भगत, प्रशांत महाराज निगडे, अच्युत महाराज व्हटटीकर ,दिलिप महाराज गगणबीडकर, शाम महाराज भिसे ,अमोल महाराज, हनुमंत महाराज शिरसाट यांची उपस्थिती होती.