06/09/25

प्रशासक SDM कविताताई जाधव मॅडम सीओनीताताई अंधारे मॅडम यांच्या कारभारावर तीव्र नाराज *बीड शहर बचाव मंचने घेतली प्रशासकांची भेट

प्रशासक SDM कविताताई जाधव मॅडम सीओनीताताई अंधारे मॅडम यांच्या कारभारावर तीव्र नाराज

*बीड शहर बचाव मंचने घेतली प्रशासकांची भेट

बीड दि.10(प्रतिनिधी) : दि.9 जुलै रोजी बीड शहर बचाव मंचाच्या समितीने नगर परिषदेच्या प्रशासक SDM मा. कविताताई जाधव यांची, बीड शहरात स्ट्रीट लॅम्प अभावी अनेक भागांमध्ये महिला भगिनी मुले,मुली व खास करून ज्येष्ठ नागरिकांना दररोज अंधाराचा सामना करावा लागत आहे. त्यातच मोकाट जनावरे व कुत्र्यांचा त्रास बऱ्याच काळापासून मोठ्या प्रमाणावर बीडची जनता सहन करत आहे, मोकाट जनावरं व कुत्र्यामुळे अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे अनेक नागरिकांना अपंगत्व आलेले आहे. नागरिकांच्या जिवाला दररोज धोका निर्माण होत आहे. या सर्व जनतेच्या समस्यांविषयी भेट घेतली. बीडकरांच्या या अडचणीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळीSDM प्रशासक म कविताताई जाधव यांनी मुख्याधिकारी नीताताई अंधारे व नगरपरिषदेच्या गलथान कारभारावर खूपच तीव्र नाराजी व्यक्त केली. मुख्याधिकारी नीताताई अंधारे व नगरपालिकेच्या सर्व गलथान कारभारावर मी लवकरच जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन चर्चा करणार आहे व शासनाला वरिष्ठ पातळीवर सर्व प्रकाराची माहिती देणार आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले. यावर बीड शहर बचाव मंचाच्या समितीने, बीड शहरातील जनता अनेक समस्यांना तोंड देत आहे. मूलभूत सोयीसुविधांचा फार मोठ्या प्रमाणावर आभाव बीड शहरांमध्ये आहे. तरी माननीय प्रशासक यांनी बीड शहरातील जनतेच्या सर्व समस्यांवर आपण सखोल लक्ष घालावे अशी विनंती केली आहे. यावेळी बीड शहर बचाव मंचाच्या वतीने निमंत्रक व अध्यक्ष नितीन जायभाये यांनी बाजू मांडली. यावेळी चर्चेत यावेळी झालेल्या चर्चेत प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डी.जी. तांदळे सर, प्रमुख सल्लागार ॲड. नितीन वाघमारे, ॲड.अनिल बारगजे, शहराचे उपाध्यक्ष परवेज भाई कुरेशी, ॲड. विलास ढाकणे, बाजीराव ढाकणे, देवा कुलकर्णी, डॉक्टर संजय तांदळे, सुधीर भाऊ देशमुख, ॲड.सुनील आंधळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …