06/09/25

*आझाद मैदानावरील आंदोलनाचे ऐतिहासिक यश* *970 कोटी 42 लाख रूपये निधीची तरतूद* *1 ऑगस्ट 2025 पासून अनुदान लागू होणार-दोन्ही सभागृहात झाली अधिकृत घोषणा* *14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी आवश्यक* *राज्यातील शिक्षकांची रास्त अपेक्षा*

*आझाद मैदानावरील आंदोलनाचे ऐतिहासिक यश*

*970 कोटी 42 लाख रूपये निधीची तरतूद*

*1 ऑगस्ट 2025 पासून अनुदान लागू होणार-दोन्ही सभागृहात झाली अधिकृत घोषणा*

*14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी आवश्यक*

*राज्यातील शिक्षकांची रास्त अपेक्षा*

बीड दि.१८(प्रतिनिध)- पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 18 जुलै रोजी विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्प्यासाठी लागणाऱ्या 970 कोटी 42 लाख रूपये निधीची तरतूद झाल्याची घोषणा दोन्ही सभागृहात केली. यावेळी 01 ऑगस्ट 2025 पासून पुढील वाढीव 20 टक्के वाढीव टप्प्या प्रमाणे अनुदान लागू करण्यात येणार आहे. शिवाय ज्या शाळा अनुदानास अघोषित होत्या. त्यामधील पात्र शाळांना 20 टक्के अनुदान जाहीर केले आहे. वाढीव टप्प्यासाठी अनुदान जाहीर झाले परंतु 01जून 2024 पासून हे अनुदान दिले जाणार आहे का? याबाबत स्पष्टता नसल्याने 01 ऑगस्ट 2025 पासून अनुदान देय झाल्यास मागील फरकाचे काय होणार हा प्रश्न शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यातून विचारला जात आहे. वाढीव टप्प्यासाठी आज घोषित केल्यानंतर जो पर्यंत परिपत्रक निर्गमित होत नाही. तोपर्यंत काहीही सांगता येत नाही असे अनेक जानकार व्यक्तीकडून बोलले जात आहे. दरम्यान शासन परिपत्रकात काय असू शकते हे निश्चित सांगता येणार नाही. घोषणा करीत असताना 14 ऑक्टोबर 2024 या शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार आहे किंवा नाही याचा उल्लेख झालेला नाही. त्यामुळे यामध्ये काही बदल होऊ शकतात का ? यामध्ये पटसंख्या कमी झाल्याने शाळांच्या बाबतीत होणारा निर्णय काय होणार ही प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे परिपत्रक कसे काढले जाईल त्यावर सर्व अवलंबून आहे. दुसरीकडे पुरवणी मागणी मध्ये कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्याने 30 जून रोजी वाढीव टप्पा अनुदानाची आशा संपुष्टात आली असताना शिक्षक समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि राज्यातील सर्व शिक्षकांनी खचून न जाता एकत्रीत सर्वानी मिळून याच अधिवेशनात शासनाला तरतूद करण्यासाठी लावले. ही मोठी अभिनंदनीय बाब आहे. राज्यातील कोणत्याही शिक्षक किंवा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी धीर सोडू नये,अशक्य ही शक्य होऊ शकते असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळाने आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना घेऊन संबंधित अधिका-यांची भेट घेतली व त्यांना 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार त्रुटी पूर्तता , कमी पटसंख्या मुळे मागे राहिलेल्या शाळा बाबत अघोषित शाळा व तुकड्या बाबत कोणताही धोका होऊ नये, कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होऊ नये याची खबरदारी घ्यावी अशी विनंती केली आहे. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करून आभार मानले.
या वेळी आ. मंगेश चव्हाण, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, खंडेराव जगदाळे, संजय डावरे, पुंडलिक रहाटे, मच्छिद्र सावंत वैद्यनाथ चाटे, लक्ष्मण सोळंकी,अजय थुल अनिल सिंग, गुलाब पाल, धनाजी साळुंखे, उमेश तिवारी इ उपस्थित होते. दुसरीकडे शासनाने घेतलेले या निर्णयाचे
बीड जिल्ह्यातील विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मराठवाडा निरीक्षक विजयसिंह शिंदे सर, छत्रपती संभाजी नगर विभाग कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे सर, मराठवाडा छत्रपती संभाजी नगर विभागाचे संघटक पंकज कळसकर सर, मराठवाडा महिला सचिव श्रीमती मुक्ता आर्दड (मोटे) मॅडम बीड जिल्हाध्यक्ष
श्री आत्माराम वाव्हळ सर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. प्रताप पवार सर,
उपाध्यक्ष श्री. रामदास जामकर सर ,
उपाध्यक्ष श्री. अरविंद सौंदलकर सर,
जिल्हा सचिव श्री. शेख सर जिल्हा संघटक
प्रताप देशमुख सर, जिल्हा सहसंघटक श्री. बाळासाहेब नागरगोजे सर, महिला उपजिल्हा अध्यक्षा दैवशाला मुंढे मॅडम, महिला सचिव सुरेखा गायकवाड मॅडम बीड तालुका अध्यक्ष श्री. भागवत यादव सर, गेवराई तालुका अध्यक्ष श्री. दीपक गरूड सर, आष्टी तालुका अध्यक्ष श्री. रविंद्र भुकन सर,पाटोदा तालुका अध्यक्ष श्री. अंकुश गवळी सर,शिरूर तालुका अध्यक्ष श्री. दशरथ साबळे सर,माजलगाव तालुका अध्यक्ष श्री. चंद्रशेखर तौर सर, वडवणी तालुका अध्यक्ष श्री. वैजनाथ शिंदे सर ,परळी तालुका अध्यक्ष श्री गोविंद आघाव सर , धारूर तालुका अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर मुंडे यांच्या सह जिल्हा विविध पदाधिका-यांनी स्वागत करून शासनाचे आभार मानले.
_______________________________________________________________

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …