06/09/25

दक्षिण आफ्रिकेचे परमपूज्य रामगोविंद स्वामी महाराज यांच्या हस्ते वैकुंठद्वाराचे उद्घाटन

दक्षिण आफ्रिकेचे परमपूज्य रामगोविंद स्वामी महाराज यांच्या हस्ते वैकुंठ द्वाराचे उद्घाटन

बीड दि.२१( प्रतिनिधी)- शहरातील
सावता माळी चौकात असलेल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनावर संघ श्री श्री राधा गोविंदा मंदिरात दक्षिण आफ्रिकेचे परमपूज्य रामगोविंद स्वामी महाराज यांच्या द्वारे वैकुंठद्वाराचे उद्घाटन करण्यात आले.
रविवार दिनांक 20 जुलै रोजी भक्तांच्या सहभागातून श्री श्री राधा गोविंद मंदिर बीड या ठिकाणी सुमारे दहा लाख रुपयांचे वैकुंठ द्वार बसविण्यात आले.त्याचे उद्घाटन करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेवरून परमपूज्य रामगोविंद स्वामी महाराज, इस्कॉन सोलापूरचे अध्यक्ष श्री. कृष्ण भक्त प्रभू व इस्कॉन बीड चे अध्यक्ष श्री.विठ्ठल आनंद प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी भक्तांना संबोधित करत असताना परमपूज्य रामगोविंद स्वामी महाराज म्हणाले “दुर्लभो मानुषो देहो देहिनां क्षणभङ्गुर: ।
तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुण्ठप्रियदर्शनम् ” मनुष्य देह दुर्लभ आहे व क्षणभंगुरही आहे. परंतु हा प्राप्त करून देखील शुद्ध भक्तांचा संग व वैकुंठाचे दर्शन दुर्मिळ भक्तांना होते.

तसेच ज्या ज्या भक्तांनी वैकुंठ द्वारासाठी देणगी दिली त्यांचेही विशेष आभार श्री श्री राधा गोविंद मंदिरातर्फे करण्यात आले व त्यानंतर भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. अशी माहिती इस्कॉन बीड चे प्रतिनिधी श्रीमान कृष्णनाम दास यांनी दिली.
_______________________________

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …