06/09/25

मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने सौ. सीमा ओस्तवाल यांचा सन्मान

मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने
सौ. सीमा ओस्तवाल यांचा सन्मान

बीड दि.३०(प्रतिनिधी)-बीड येथील गुरू आनंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. सीमा ओस्तवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ संजय तांदळे आणि पत्रकार आत्माराम वाव्हळ सर यांनी त्यांचा सन्मान करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
बीड शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकांनी ज्यांचा उल्लेख करावा लागेल अशा सामाजिक कार्यकर्त्या सौ सीमा ओस्तवाल मॅडम सामाजिक कामात स्वतःला झोकून देऊन आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक कार्य करत असताना दायित्व सांभाळणाऱ्या सीमा ओस्तवाल मॅडम सातत्याने गोरगरीबांना मदत करत असतात. मागील काही वर्षापासून
शैक्षणिक क्षेत्रात अतिशय मोठ्या प्रमाणावर ग्रामीण व शहरी भागातील
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वह्या,पेन, कंपास यासह इतर शालेय साहित्याचे वाटप करतात. दरवर्षी त्या वाटप करण्याच्या शैक्षणिक साहित्याच्या संख्येत वाढ करत आहेत. यावर्षी त्यांनी एक लाख वह्या, पेन आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केले आहे. तसेच त्या सणाच्या निमित्ताने गोर गरीबांना किराणामाल देऊन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करतात. अशा जेष्ठ समाजसेविका सीमा ओस्तवाल मॅडम यांचा वाढदिवस होता. सातत्याने समाजसेवेचा वृत्त स्वीकारणाऱ्या सीमा ओस्तवाल मॅडम यांच्या वाढदिवसाला सणासारखे स्वरूप निर्माण झाले आहे. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बीड शहरातील मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय तांदळे यांच्यासह पत्रकारिता आणि शिक्षण क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणारे पत्रकार श्री आत्माराम वाव्हळ यांनी सीमा ओस्तवाल यांच्या घरी जाऊन त्यांचा यथोचित सन्मान सन्मान पत्र, पुष्पगुच्छ शाल आणि श्रीफळ देऊन केला. शिवाय त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा दिल्या.

 

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …