06/09/25

खांडे पारगाव येथे महाराष्ट्र आधार सेनेचे शाखा उद्घाटन थाटात संपन्न. अठरा पगड जाती धर्माच्या जनसेवेसाठी कटिबद्ध- दीपक थोरात

खांडे पारगाव येथे महाराष्ट्र आधार सेनेचे शाखा उद्घाटन थाटात संपन्न.

अठरा पगड जाती धर्माच्या जनसेवेसाठी कटिबद्ध- दीपक थोरात

  1. बीड दि.०२(प्रतिनिधी)- ना जातीचा न धर्माचा एक हात मदतीचा उल्लेखनीय कार्य असलेल्या महाराष्ट्र आधार सेनेच्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या संघटनेचे नावलौकिक कार्य आहे त्यांची आरोग्य सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये या अगोदरच वेगळी ओळख आहे बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा ग्रामीण भागातून माणूस येतो, तेव्हा त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारा माणूस कोणी असेल तर फक्त दिपक थोरात यांच्याकडे पाहिले जाते तर यावेळी आता महाराष्ट्र आधार सेनेची शाखा ही बीड तालुक्यातील दुसरी शाखा खांडे पारगाव या ठिकाणी स्थापन करण्यात आली महाराष्ट्र आधार सेनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी ‘ना जातीचा ना धर्माचा एक हात मदतीचा हेच ब्रीदवाक्य घेऊन आज बीड जिल्ह्यामध्ये तरुण महाराष्ट्र आधार सेनेचा झेंडा हाती घेत आहे यामध्ये काल खांडे पारगाव या ठिकाणी शाखा उद्घाटन झाली. या शाखा उद्घाटनासाठी सर्व जाती धर्मातील तरुण माता भगिनी मित्र बंधू उपस्थित होते. या शाखाच्या माध्यमातून नक्कीच गोरगरिबांना बीड जिल्ह्यामध्ये आरोग्य किंवा पोलीस प्रशासन कुठली अडचण असेल तर त्यांना मदत मिळेल असे प्रतिपादन माझी सरपंच अशोक जिजा आमटे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र आधार सेनेच्या दिपक थोरात याच्या हस्ते शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी
    सरपंच रामेश्वर आनेराव, उपसरपंच अनिल आबा माजी उप सरपंच अशोक जिजा आमटे,युवा नेते राजेंद्र आमटे अशोक वाघमारे रवी वाघमारे महाराष्ट्र आधार सेनेचे कार्याध्यक्ष युवा नेते अशोक आबा वाघमारे, कपिल जोगदंड, ज्येष्ठ नेते दत्ता सौंदरमल उपस्थित होते. महाराष्ट्र आधार सेनेची खांडे पारगावची कार्यकारणी खालील प्रमाणे करण्यात आली. शाखा अध्यक्ष परशुराम वाघमारे उपाध्यक्ष – अमोल वाघमारे शाखा सचिव-महादेव वाघमारे सदस्य राहुल वाघमारे कृष्णा वाघमारे सतोष वाघमारे सुदाम वाघमारे आयुष्य वाघमारे जय वाघमारे हनुमान वाघमारे क्रिश वाघमारे सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी अभिनंदन व शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …