06/09/25

सरकारने गोहत्ये प्रमाणेच शेळी आणि कोंबड्यांची हत्या देखील बंद करावी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना आश्रय सेवा केंद्राच्या वतीने निवेदन – पत्रकार शेख आयेशा

गोहत्याबंदी प्रमाणेच शेळी आणि कोंबड्यांची हत्या बंद करावी

पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना आश्रय सेवा केंद्राच्या वतीने निवेदन – पत्रकार शेख आयेशा

मुंबई दि.०२(प्रतिनिधी)- सरकारने गोहत्येप्रमाणेच शेळी,मेंढी,कोंबड्या आणि अन्य कोणत्याही जिवाची हत्या देखील बंद करण्या बाबत कठोर कायदा लागू करून त्यांचे जीव देखील वाचवावते अशी मागणी पर्यावरण मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे साहेब यांना रामटेक शासकीय निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात आली असल्याचे पत्रकार शेख आयेशा यांनी सांगितले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रामध्ये गोहत्या बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाच्या अनुषंगाने मुस्लिम समाजाने मागील काही दिवसापासून आपली कत्तलखाने बंद केलेली आहेत. गोमास विक्री आणि खरेदी बंद असून जनावरांची कत्तल करणे देखील बंद केलेले आहे.आता महाराष्ट्र सरकारने गोमांस हे जसे खरेदी आणि विक्री बंदीचा निर्णय घेतला. त्याच प्रकारे मांस म्हणून आहारात वापरण्यासाठी शेळी, मेंढी, कोंबड्या, चित्तर आदिंसह काही वन्य प्राणी व पक्षी यांचा देखील सर्रास वापर करत आहेत. त्यांना देखील जीव असल्याने महाराष्ट्र सरकारने गोहत्या प्रमाणेच शेळी, मेंढी, कोंबड्या, चित्तर अथवा अन्य कोणत्याही जीव प्राण्यांची हत्या बंदी करण्याचा निर्णय कायदेशीर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्र सरकारला पर्यावरण मंत्री म्हणून आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे प्रत्यक्ष पंकजा मुंडे यांना मुंबई येथील रामटेक शासकीय बंगल्यावर भेट घेऊन पत्रकार तथा आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्षा शेख आयेशा यांनी  केली.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …