06/09/25

अकरावी कला विज्ञान शाखेसाठी विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे प्रवेश द्यावा-प्रा.सतीश मोराळे*

*अकरावी कला विज्ञान शाखेसाठी विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे प्रवेश द्यावा-प्रा.सतीश मोराळे*

नांदुर घाट दि.०२ (प्रतिनिधी) :- शैक्षणिक वर्ष 2025 -26 पासून अकरावी कला विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून यामध्ये विज्ञान शाखेसाठी विद्यार्थ्यांचा कल जास्त आहे कला शाखेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश ऑनलाइन प्रक्रियेतून घेण्यास अडचणी येत आहे कारण त्यांना जे कनिष्ठ महाविद्यालय पाहिजे ते मिळत नाही कला शाखेच्या तुकडीचा विचार केला तर प्रवेश खूपच कमी झाले आहेत एक तर विद्यार्थी कला शाखेत प्रवेश घेण्यास जास्त इच्छुक नसतो कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकाकडून त्यांना प्रवेश घेण्यास प्रवृत्त केले तरी ऑनलाईन मुळे त्या विद्यार्थ्यांचे प्रवेश होत नाही ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आरक्षणा नुसार प्रवेश आहे कला शाखेला ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून शिक्षण विभागाने सूट द्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांचे कला शाखेस प्रवेश होतील तसेच या शाखेला अध्यापनाचे कार्य करणारे प्राध्यापक वर्ग अतिरिक्त ही होणार नाही तसेच विज्ञान शाखेसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्या भागात आहेत त्या ठिकाणी त्यांना प्रवेश मिळणे आवश्यक आहे त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे बाहेर शहराच्या ठिकाणी जाणे शक्य नाही त्यामुळे बरेच विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे तरी ग्रामीण भागात ज्या ठिकाणी स्थानिक चे विद्यार्थी आहेत त्यांना प्राधान्य देण्यात यावे म्हणून बीड जिल्हा संघटनेच्या मागणीचा विचार शिक्षण विभागाने करावा असे आवाहन कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश मोराळे यांनी केले आहे
ग्रामीण भागातील पालक वर्ग आपल्या आर्थिक परिस्थिती मुळे किंवा इतर अडचणीमुळे आपल्या पाल्याला इतरत्र ठेवण्यास जास्त इच्छुक नाही ज्या गावात उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालय आहे त्याच ठिकाणी परिसरातील पालक वर्गांचा प्रवेश घेण्यास आग्रह आहे या संदर्भात लेखी निवेदन सोमवारी शिक्षण विभागाला देण्यात येणार आहे असे जुक्टा संघटनेच्या वतीने प्राध्यापक सतीश मोराळे यांनी म्हटले आहे

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …