महिला दक्षता समिती प्रमाणे पुरुष दक्षता समिती राज्यात स्थापन करा -शेख आयेशा
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता फडणवीस यांना आश्रय सेवा केंद्राच्या वतीने निवेदन
मुंबई दि.०२(प्रतिनिधी)-
महिलांवर अत्याचार झाला तर त्यांना न्याय देण्यासाठी संपूर्ण राज्यभरात पोलिस स्टेशन अंतर्गत महिला दक्षता समिती कार्यरत आहे. त्यामुळे पीडित महिलांना न्याय मिळतो.मात्र जे पुरुष स्त्रियांच्या त्रासापासून त्रस्त झालेले आहेत त्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुरुष दक्षता समिती स्थापन करावी अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण करावी अशी मागणी आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्षा शेख आयेशा यांनी प्रत्यक्ष भेटून केली आहे.या भेटी मध्ये त्यांनी बऱ्याच वेळ विविध विषयावर सविस्तर सकारात्मक चर्चा केली.
महाराष्ट्रामध्ये महिलांवर अत्याचार होतात.या अत्याचारांना न्याय मिळावा पिढीताना त्रासापासून मुक्तता मिळावी.यासाठी राज्यभरामध्ये पोलीस स्टेशन अंतर्गत महिला दक्षता समिती गठीत करण्यात आलेली आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये महिलांकडून पुरुषांवर होणारे अत्याचार सुद्धा कमी नाहीत. अशा पीडित पुरुषांना न्याय मिळावा यासाठी राज्यातील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत पुरुष दक्षता समिती गठीत करण्यात यावी.अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाजी यांना निवेदन देऊन आश्रय सेवा केंद्राच्या वतीने केली आहे. या मागणीला न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे घालावे आणि राज्यातील पीडित पुरुषांना न्याय द्यावा अशी मागणी प्रसिद्ध सुमधुर गायिका, उत्कृष्ठ अभिनेत्री तथा समाजसेविका अमृता फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून केली असल्याचे पत्रकार तथा आश्रय सेवा केंद्राच्या अध्यक्ष शेख आयेशा यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
चौकट…
अमृता फडणवीस यांची नम्रता अमृताहुनही गोड जाणवली…
महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि चाणाक्ष मुख्यमंत्री म्हणून ज्यांची जगभर ख्याती आहे अशा देवाभाऊंची सुविध पत्नी प्रसिद्ध अभिनेत्री,सुमधुर गायिका,सामाजिक कार्यकर्त्यां अमृता फडणवीस यांनी केवळ भ्रमणध्वनीवर झालेल्या मैत्रीला जागून प्रत्यक्ष मुंबईत भेटीसाठी आमंत्रित केले. प्रत्यक्ष भेटी दरम्यान त्यांनी मोठ्या अज्बीने म्हणाल्या,बीड वरून मला खास भेटण्यासाठी आलेल्या त्या आयेशा कुठे आहेत.असे आपल्या सिक्युरिटी गार्डला विचारत त्यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून प्रत्यक्ष भेट घेतली. विविध विषयावर बाजूला खुर्ची टाकून सविस्तर बराच वेळ मनमोकळ्या गप्पा मारल्या.आणि पुन्हा आपण भेटत राहू. तुमच्याशी भेटून गप्पा मारू खूप चांगले वाटले. अशी भावना व्यक्त केली.त्यांच्यामध्ये असलेली माणुसकी, आपलेपणा हा अमृताहुनी गोड जाणवला. भेटीचा हा क्षण अविस्मरणीय ठरला.