*गुरु आनंद महिला प्रतिष्ठान व प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने गोरक्षनाथ विद्यालयात मोफत शैक्षणिक साहित्य वाटप*
शाळेच्या माध्यमातून आम्ही विविध क्षेत्रांमध्ये मुलांचे भविष्य घडवले – सोमनाथराव बडे.
बीड दि.५(प्रतिनिधी)-
बीड तालुक्यातील ढेकनमोहा येथील गोरक्षनाथ प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड व प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात इ. पहिली ते दहावीच्या मुलाना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप गुरु आनंद महिला प्रतिष्ठान व प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने ऊसतोड कामगार शेतकरी कष्टकरी यांच्या मुलांना एक मदतीचा हात म्हणून मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गेल्या अनेक वर्षापासून सहकार्य करत आलेले हे प्रतिष्ठान आहे यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ.सीमा मनोज ओस्तवाल (अध्यक्ष गुरु आनंद प्रतिष्ठान बीड ) समंदर खान ( गटशिक्षणाधिकारी प. स बीड ) माजी प्राचार्य तथा मकरध्वज शिक्षण संस्थेचे सचिव सोमनाथराव बडे सिद्धेश्वर माटे (ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी प. स. बीड ) नागेश शिंदे (माजी सरपंच ढेकणमोहा) अदनान खान ( कार्यकारी संपादक दैनिक किसान बीड ) बंडू गाडीवान ( सरपंच) अनिल वाघमारे ( संपादक डोंगरचा राजा) अंकुश गोरे (मु .अ सरस्वती विद्यालय बीड) साजिद अहमद सिद्दिकी ( केंद्रप्रमुख ) बालाप्रसाद जाजू (चेअरमन ) संतोष जाधव ( ग्रामपंचायत सदस्य )आदीं मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुंडे डी .एस. सर , घोळवे सर (उपमुख्याध्यापक) संजय बडे सर , बोराडे सर , जाधव सर सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी प्राध्यापक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .