नवोदय विद्यालयात 11 वी विज्ञान वर्गात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
बीड, दि. 6 (प्रतिनिधी)-
जवाहर नवोदय विदयालय गढी येथील नवोदय विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेशासाठी 11 विज्ञान वर्गात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन प्राचार्य विजयकुमार भोस यांनी केले आहे.
गढी येथील जवाहर नवोदय विदयालयात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रवेशासाठी पात्रता आणि प्रवेश अर्ज फॉर्म नवोदय विदयालय समितीच्या वेबसाइट https://nvsropunelap.co.in/classxi/ वर तसेच जवाहर नवोदय विदयालय, गढी, ता. गेवराई, जि. बीड च्या कार्यालयात ऑफलाईन/प्रत्यक्ष विनामुत्य उपलब्ध आहेत. योग्यरित्या भरलेले अर्ज दि.10/08/2025 पर्यंत थेट विदयालयात व ईमेल/ऑफलाइनव्दारे सादर करता येतील. विदयालयााचा ईमेल address pmshrijnvbeed@gmail.com. हा आहे.11 विज्ञान वर्गात प्रवेश गुणवत्ते नुसार देण्यात येतील.तरी 11 वी विज्ञान वर्गात प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी मुदतीत प्रवेश अर्ज सादर करावेत. आसे आवाहन जवाहर नवोदय, विद्यालयाचे प्राचार्य विजयकुमार भोस यांनी केले आहे.