06/09/25

बीड जिल्ह्यातील पत्रकारांच्या घरासाठी जागा उपलब्ध करून द्या लोकशाही पत्रकार संघाचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन

  • बीड जिल्ह्यातील पत्रकारांच्या घरासाठी जागा उपलब्ध करून द्या
    लोकशाही पत्रकार संघाचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना निवेदनबीड दि.७(प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यातील शेकडो पत्रकारांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून देशाचे व समाजसेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबीयांना राहण्यासाठी घर बांधता आले नाही. परंतु आजच्या काळात आपल्या कुटुंबीयांचे घराचे स्वप्न पूर्ण करता यावे या भावनेतून आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सदैव तळमळ करणाऱ्या पत्रकारांची वेदना आणि व्यथा लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्ञबीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी पत्रकारांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी. या मागणीचे निवेदन लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने
    लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य, मराठवाडा विभागाचे कार्याध्यक्ष आत्माराम वाव्हळ आणि बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष साहस आदोडे यांनी
    दिले.
    बीड जिल्ह्याच्या पत्रकारितेला मोठा इतिहास आहे. जनसेवा हीच ईश्वरसेवा माणून या जिल्ह्यातील अनेक गुणी पत्रकार तुटपुंज्या मानधनावर काम करत होते शिवाय आहेत ही जिल्ह्यातील अनेक पत्रकारांनी पत्रकारितेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य वेचले, आपल्या पत्रकारितेच्या काळात या पत्रकारांनी कुटुंबाचा किंवा आपल्या घरातील सदस्यांच्या सुखाचा विचार कधीच केला नाही. आज जिल्ह्यातील विविध दैनिकातील शेकडो पत्रकार वयोवृद्ध झाले आहेत. कित्येक पत्रकारांचे आयुष्य संपले तरीही त्यांना आपल्या कुटुंबीयांसाठी घर बांधता आले नाही. आजच्या काळात पत्रकारांना
    प्लॉट खरेदी करून घर बांधणे
    अशक्य बाब झाली आहे. पत्रकारिता करत असताना आपल्या कुटुंबीयांचे घराचे स्वप्न पूर्ण करता यावे यासाठी ही बाब लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी बीड जिल्ह्यातील पत्रकारांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी
    या मागणीचे निवेदन दिले. यावेळी अजित पवार यांनी सकारात्मकता दावून जागा उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले आहे.
    या निवेदनावर संस्थापक अध्यक्ष लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य, प्रदेश उपाध्यक्षा
    हलीमा शेख, मराठवाडा कार्याध्यक्ष
    श्री आत्माराम वाव्हळ बीड जिल्हाध्यक्ष
    श्री साहस आदोडे, जिल्हा संघटक
    श्री संजय कुलकर्णी यांच्या सह्या आहेत.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …