06/09/25

शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करा – प्रा. बबनराव आंधळे

शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करा – प्रा. बबनराव आंधळे

बीड दि.१०(प्रतिनिधी)- शेतकऱ्याचे पिक विम्याचे पैसे केंद्र व राज्य सरकारने विमाकंपन्यांना वर्ग केलेले असूनही केंद्रातील व राज्यातील या दोन्ही कृषी मंत्र्यांना शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे वर्ग करण्याचा सापडेनासा झाला आहे. मुहूर्त कधी सापडतो हे शेतकऱ्यांना कळेना शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. शेतकऱ्यांना सतत त्रास देण्याचे काम हे शासन करत आहे. या देशातील शेतकरी राजा हा सतत कष्ट करणारा वर्ग आहे. शेतीमध्ये राबराब राबायचे अनेक संकटावर मात करून उत्पन्न काढायचे आणि बाजारामध्ये आडतीवर गेल्यानंतर या उत्पन्नाचा भाव त्या आडतीवाल्याने ठरवायचा अशी वाईट अवस्था शेतकऱ्याची आहे पिकवलेला माल आहे. त्याची किंमत करण्याचा अधिकार सुद्धा शेतकऱ्याला नाही त्यामध्ये निसर्ग कोपला की पाऊस वेळेवर पडत नाही पाऊस पडला तरी कीटकनाशके औषधी खते बी बियाणे ही बोगस घ्यावी लागतात अशा अनेक संकटाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो पाऊस जर वेळेवर नाही पडला तर शेतकऱ्यावर दुपार पेरणीची वेळ येते शेतकऱ्यांना ठिबक साठी कर्ज असेल स्प्रिंकलर साठी कर्ज असेल अशा वेगवेगळ्या प्रकारची कृषी कर्ज असतील हे कर्ज घेण्यासाठी बँका शेतकऱ्यांना लवकर कर्ज देत नाहीत आणि माझा शेतकरी राजा बँकेत चकरा मारू मारू कदरून जातो अशी परिस्थिती आज शेतकऱ्याची आहे. शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या कमकुवत करून शासनाने खूप मोठे नुकसान केले आहे. शेतकरी जगला पाहिजे यासाठी शासनाने विविध योजना राबवल्या पाहिजेत शेतकरी जर आज जगला तर देशामध्ये अन्नधान्याचा तुटवडा होणार नाही म्हणून शासनाने शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्यावा केंद्र व राज्य शासनाने एक महिना झाला. विमा कंपन्यांना पैसे वर्ग केले आहेत. केंद्राच्या व राज्याच्या या दोन्ही मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण शेतकऱ्याच्या बँक खात्यावर विम्याचे पैसे वर्ग करण्याचे आदेश तात्काळ काढावेत अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …