अपघातातील जखमी जनावरांचे प्राण
डॉ. तेजस दुनघव यांनी वाचविले!
सर्व स्तरातून डॉ दुनघव यांचे होत आहे कौतुक
बीड दि.११(प्रतिनिधी)- शहरातील बसस्थानका समोर शनिवार रोजी रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास जालना रोडवर एका अज्ञात वाहनाने मोकाट जनावरांसह दोन म्हशींच्या पिल्लांना धडक दिली. यात मोकाट जानावरांसह म्हशींची दोन्ही पिल्ले गंभीर जखमी झाल्याची माहिती डॉ. तेजस दुनघव यांना मिळताच दुनघव यांनी तत्काळ जखमी जनावरांवर उपचार केल्यामुळे जीवदान मिळाले. डॉ दुनघव यांनी कामामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की
बीड शहरातील बस स्थानकासमोर नेहमीच मोकाट जनावरांचा वावर असतो. काही प्रसंगी हे जनावरे रस्त्यावर ठाण मांडून बसलेले असतात. त्यांच्यामुळे अनेक वेळा अपघात झालेले आहेत.
शनिवार रोजी रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास जालना रोडवर एका चारचाकी वाहन मोकाट जनावरांसह दोन म्हशींच्या पिल्लांना जोरात धडक देऊन ही चारचाकी दुभाजकावर गेली. या अपघातात दोन म्हशीचे पिल्ले गंभीर जखमी अवस्थे मध्ये पडले होते. या घटनेची माहिती मिळताच जनावराचे डॉक्टर तेजस दुनघव यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या जनावरांवर उपचार करायला सुरुवात केली. अगदी वेळेत उपचार सुरू झाल्यामुळे गंभीर जखमी जनावरांना वाचवण्यात डॉक्टर दुनघव यांना यश आले. मोकाट गंभीर जखमी झालेल्या या जनावरांवर उपचार करून त्यांना जीवदान देणाऱ्या डॉ. दुनघव यांनी केलेल्या या कामामुळे जनावराचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.