अनुदानित अंशतः अनुदानित शाळांच्या वाढीव टप्पा अनुदानाच्या जीआरचे काम अंतिम टप्यात
मुंबई दि.12(प्रतिनिधी)-राज्यातील विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आला या वाढीव टप्प्यासाठी लागणारा 970 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला परंतु अद्यापही अनुदान वितरणाचा जीआर अद्याप निघालेला नाही. अनुदान वितरणाचा जीआर लवकर काढावा यासाठी
आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासोबत विना अनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी अर्थ विभाग आणि शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या यावेळी लवकरच अनुदान वितरणाचा जीआर निघणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आले. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्येच वाढीव टप्पा अनुदानाच्या निधी वितरणाचा जीआर निघून शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा होऊन होईल असे खंडेराव जगदाळे यांनी सांगितले.
राज्यातील विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा मिळावा यासाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर दि 8 व 9 जुलै रोजी न भूतो न भविष्य असे आंदोलन केले. या विराट आंदोलनाची राज्य सरकारने दखल घेऊन. सुरूअसलेल्या पावसाळी अधिवेशनात
17 जुलै रोजी टप्पा वाढीसाठी लागणारा निधी 970 कोटी रुपये मंजूर केले. पंरतु आज जवळ जवळ महिना झाला तरी वाढीव टप्पा वितरणाचा जीआर अद्याप निघालेला नाही. वाढीव टप्पा निधीच्या संदर्भातला जीआर तातडीने काढावा या मागणीसाठी मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी आ. ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समीर सावंत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फाइल पूर्ण होऊन वित्त विभागाकडे गेली असल्याचे सांगितले. त्यानुसार वित्त विभागाचे प्रधान सचिव श्री विजय सौरभ यांची भेट घेतली, त्यांनी कालच फाइल आमच्याकडे आलेली आहे, त्या मध्ये काही अडचण नाही दोन दिवसात ही फाईल पूर्ण करून शिक्षण विभागाकडे जाईल. यामधील असणाऱ्या सर्व बाबी पूर्ण करीत आहोत असे सांगितले. त्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. यावेळी शिक्षण मंत्री भुसे यांनी राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेच्या वाढीव टप्प्यासाठी 970 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे, हे पैसे मंजूर देखील झालेले आहेत, त्यामुळे कुणीही काळजी करू नका सर्व बाबी पूर्ण करून लवकरच वाढीव टप्प्याचा जीआर येणार असल्याचे सांगितले. तसेच शेवटच्या वर्गाची पटसंख्या पुढील वर्षाचे पकडून अनुदान मिळावे या करिता शिक्षण मंत्री माननीय सचिव यांच्याशी चर्चा केली, व शिक्षण संचालक कार्यातून माहिती तात्काळ आपल्याकडे मागवावी अशी विनंती केली.
यावेळी , पुंडलिक रहाटे भारत जामनिक, सुधाकर वाहूरवाघ,शंकर शेरे ,सावंता माळी, किरण चव्हाण प्रवीण लोंढे, विजय राणे, खेडकर सुभाष, जयपाल मोरे इ उपस्थित होते.