माजी सैनिक सोपानराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ
जननेता सन्मान 2025 पुरस्कार जाहीर!
अभिनेता मिलिंद शिंदे, संतोष मानूरकर, अनिल जाधव, गणेश सावंत, विजयराज बंब, डॉ. सिद्दीकी, तहसीलदार चंद्रकांत शेळके, उत्तम पवार, प्रदीप रोडे, आत्माराम वाव्हळ, विशाल गायकवाड, गितांजली वानखेडे यांचा होणार सन्मान
१५ ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या
हस्ते पुरस्काराचे थाटात होणार वितरण!
बीड (प्रतिनिधी) – देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून देशसेवा करणारे माजी सैनिक सोपानराव दादा गायकवाड यांच्या स्मरणार्थ व सायं दैनिक जननेताच्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या गुणवंत व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानीत केले जाणार आहे. या पुरस्कारासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गुणवंत आणि कर्तुत्ववान व्यक्तीच्या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार प्राप्त मान्यवरांवर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या पुरस्कारार्थींचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. सदरील पुरस्कार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते वितरीत सोहळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संपादक नंदू गायकवाड यांनी दिली.
पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय देणारे तसेच जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आदर्श आणि दीपस्तंभ ठरणारे शांत, संयमी व सदैव हसमुख असलेले दैनिक दिव्य लोकप्रभाचे संपादक संतोष मानुरकर, दैनिक रिपोर्टरचे कार्यकारी संपादक श्री गणेश सावंत आणि दैनिक राज्य लोकतंत्रचे उपसंपादक अनिल जाधव, पत्रकार गितांजली वानखेडे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच बीड जिल्ह्यातील एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण करत शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारे जैन पत्रा उद्योगाचे प्रसिद्ध उद्योगपती जैन अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष आणि दैनिक लोकाशाचे संपादक श्री विजय बंब यांची उत्कृष्ट राज्यस्तरीय आदर्श समाजसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. प्रत्येक दिवशी तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी आपल्या कार्यालयाचे दरवाजे सदैव खुले ठेवून काम करणारे बीड तहसीलचे कार्यतत्पर तहसीलदार श्री चंदकांत शेळके यांचे नावं प्रामुख्याने घेतले जाते. उत्कृष्ट राज्यस्तरीय प्रशासकीय अधिकारी या पुरस्कारासाठी तहसीलदार श्री चंद्रकांत शेळके यांची निवड करण्यात आली. आरोग्य सेवेच्या माध्यमातून रुग्णांना जीवदान देणारे ओपन हार्ट सर्जरी करणारे पॅराडाईज हॉस्पिटलचे डॉ. सिद्दीकी यांना राज्यस्तरीय आदर्श वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. राज्यस्तरीयशिक्षण संस्था स्थापन करून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे, शिक्षणाची गंगा विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत पोहोचवणारे एक यशस्वी संस्थाचालक म्हणून बीड जिल्ह्यासह राज्यांमध्ये त्यांनी ओळख निर्माण केली असे सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री उत्तम पवार आणि तुलसी शिक्षण समूहाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे सर यांना उत्कृष्ट राज्यस्तरीय आदर्श संस्थाचालक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. असणशिक्षकाने समाजाला दिशा मिळेल असे कर्तृत्व निर्माण केले पाहिजे. त्यामुळे शिक्षकांनी सामाजिकतेचे भान जोपासावे, अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करत असताना पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सदैव सहभागी असणारे विना अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनासह इतर प्रश्नावर सातत्याने लढा देणारे विनाअनुदानित शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष श्री आत्माराम वाव्हळ सर यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच बेस्ट कर्मचारी म्हणून महाराष्ट्र राज्य वीज वितरण चे कर्मचारी विशाल गायकवाड यांना देखील गौरविण्यात येणार आहे. एकंदरीत बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रात ‘रत्न’ असलेल्या या अकरा रत्नांचा 15 ऑक्टोबर 2025 रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते आपल्या आपल्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण व उल्लेखनीय काम केल्याबद्दल निवड करण्यात आलेल्या मान्यवरांचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या राज्यस्तरीय आदर्श पुरस्कारासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव मागविण्यात आलेला नाही. या पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आता पर्यंत केलेल्या कार्याची व समाज माध्यमात असलेल्या त्यांच्या बाबतीत केलेल्या चांगल्या गुणांची व कामाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याची माहिती सायं. दैनिक जननेताचे संपादक नंदू गायकवाड उपसंपादक आणि निवड समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे. पुरस्कार मिळालेल्या सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.