…अखेर वाढीव टप्पा अनुदानाचा शासनादेश निर्गमित
विना अनुदानित शाळा कृती समिती बीड जिल्ह्याच्या वतीने शासनाचे आभार !
बीड दि.25(प्रतिनिधी) -राज्य शासनाने
राज्यातील विना अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदान पावसाळी अधिवेशनात मंजूर केल्यानंतर त्या संदर्भातला शासनादेश अखेर आज सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7:36 सुमारास निर्गमित करून विना अनुदानित शाळेच्या वाढीव टप्पा अनुदानाच्या प्रश्न मार्गी लागला. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे विनाअनुदानित शाळा कृती समिती बीड जिल्हा शाखेच्या वतीने वैजनाथ चाटे, जितेंद्र डोंगरे, जिल्हाध्यक्ष आत्माराम वाव्हळ यांनी जाहीर आभार मानले.
राज्यातील विना अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदान मिळावे या मागणीसाठी सातत्याने शिक्षक संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत होते. आंदोलनाच्या मागणीचा पाठपुरावा करत असताना 8 आणि 9 जुलै रोजी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात मोठे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाची दखल घेतली. तसेच सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्येच वाढीव टप्पा अनुदानासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करून असे आश्वासन दिले. नुसता आश्वासन देऊन मुख्यमंत्री थांबले नाहीत तर मुख्यमंत्र्यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 9 जुलै रोजी वाढीव टप्पा अनुदानासाठी लागणाऱ्या निधीची घोषणा केली. केवळ घोषणा करून सरकार थांबले नाही. तर यावेळी वाढीव टप्प्यासाठी लागणाऱ्या 970 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली. शिवाय 01 ऑगस्ट 2025 रोजी पासून प्रत्येक शिक्षकांच्या खात्यात वाढीव टप्प्याचा पगार देणार असल्याचे आश्वासन दिले. परंतु अधिवेशन संपून महिना दीड महिना झाला तरी शासन आदेश निर्गमित झाला होत नसल्याने शिक्षण समन्वय संघाच्या वतीने मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. ‘बोले तैसे चाले’ या म्हणीप्रमाणे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शासनादेश निर्गमित करण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश दिले. त्यानंतर शासन आदेश निर्गमित करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. अखेर आज सोमवार दिनांक 25 रोजी सायंकाळी 7:36 वाजण्याच्या सुमारास वाढीव टप्पा अनुदानाचा शासन आदेश निर्गमित केला. शासन आदेश निर्गमित होताच महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती बीड जिल्हा शाखेच्या वैजिनाथ चाटे, जितेंद्र डोंगरे, लक्ष्मण जगताप, विजयसिंह शिंदे, मुक्ताताई मोटे-अर्दड मॅडम, बीड जिल्हा अध्यक्ष आत्माराम वाव्हळ, रामदास जामकर, शेख सर,बाळासाहेब नागरगोजे, रवींद्र भुक्कन, जावेद पठाण, दिपक गरुड, चंद्रशेखर तौर, अंकुश गवळी, प्रताप पवार, भागवत यादव, अशोक मोरे, सुरेश कदम यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी
वतीने आनंद साजरा करून शासनाचे आभार मानले.