संपादक आत्माराम वाव्हळ यांचा कुलकर्णी व गायकवाड यांच्या वतीने सत्कार संपन्न
बीड दि.23 (प्रतिनिधी) – सायं दैनिक जननेताच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने माजी सैनिक सोपानराव दादा गायकवाड यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जननेता सन्मान 2025 पुरस्कार बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीचे बीड जिल्हाध्यक्ष तथा शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचे श्री आत्माराम वाव्हळ सर यांना नुकताच जाहीर करण्यात आला. सदरील मानासन्मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री आत्माराम वाव्हळ सर यांचे कुक्कडगाव येथील दत्ता गायकवाड आणि किशोर कुलकर्णी यांनी सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
सायं दैनिक जननेताच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने माजी सैनिक सोपानराव दादा गायकवाड यांच्या स्मरणार्थ विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या गुणवंत व्यक्तींना जननेता सन्मान 2025 हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानीत केले जाणार आहे. या मध्ये विद्यार्थ्यांना घडविण्याचे व ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना पत्रकारितेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक कार्यात सदैव सहभागी असणारे राज्यातील विना अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनासह इतर प्रश्नावर सातत्याने लढा देणारे महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष तथा शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचे आदर्श शिक्षक, मुख्याध्यापक तसेच आदर्श पत्रकार, संपादक या विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले श्री आत्माराम वाव्हळ सर यांनी आतापर्यंत केलेल्या शैक्षणिक, सामाजिक आणि पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन जननेता सन्मान 2025 या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. दि. 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता भव्य दिव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सदरील दैनिक जननेता सन्मान 2025 पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री आत्माराम वाव्हळ सर यांचा सत्कार कुक्कडगाव येथील दत्ता गायकवाड आणि किशोर कुलकर्णी यांनी सोमवार दिनांक 25 रोजी शासकीय विश्रामगृहावर यथोचित सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
_________________________________