06/09/25

नागरिकांनी गणेशोत्सव मोठ्या आनंदात व शांततेत साजरा करा -तहसीलदार शेळके तहसीलदारांच्या हस्ते लोकशाही पत्रकार संघाच्या ‘श्री’ ची आरती संपन्न

नागरिकांनी गणेशोत्सव मोठ्या आनंदात व शांततेत साजरा करा -तहसीलदार शेळके

तहसीलदारांच्या हस्ते लोकशाही पत्रकार संघाच्या ‘श्री’ ची आरती संपन्न

बीड दि.२८(प्रतिनिधी)- गणेशोत्सव आनंदात आणि शांततेत साजरा करण्याची
हिंदू संस्कृती आहे त्या हिंदू संस्कृतीला अनुसरून बीड शहरासह तालुक्यातील नागरिकांनी गौरी गणपती सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करावा असे आवाहन बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी लोकशाही पत्रकार संघाचा धानोरा रोडचा राजा गणेश मंडळाच्या येथे ‘श्री’ च्या आरतीच्या निमित्ताने केले.
प्रति वर्षी प्रमाणे याही वर्षी लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने धानोरा रोड परिसरात लाडक्या गणरायाची स्थापना करण्यात आली. स्थापनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळची आरती लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य व जिल्हाध्यक्ष साहस आदोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आली. सायंकाळची आरतीसाठी बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्या नंतर सायंकाळी सातच्या सुमारास तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे यांच्या शुभहस्ते ‘श्री’ ची आरती करण्यात आली. आरती संपन्न झाल्यानंतर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी हिंदू संस्कृतीमध्ये सर्व सण उत्सव मोठ्या आनंदात आणि शांततेत साजरा करण्याची संस्कृती आहे. त्या हिंदू संस्कृतीला अनुसरून बीड शहरासह तालुक्यातील नागरिकांनी गौरी गणपती सणासह मुस्लिम बांधवांचा ईद सण ही मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करावा असे आवाहन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी केले. तसेच देव, देश आणि धर्म यासाठी आपण सर्वांनी मिळून सातत्याने काम केले पाहिजे असे आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे यांनी यावेळी केले. आरती नंतर तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा लोकशाहीचे संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य व जिल्हाध्यक्ष सहस आदोडे यांनी तर भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ अण्णा शिराळे यांचा सत्कार संजय देवा कुलकर्णी व नितेश उपाध्ये यांनी केला. या आरतीच्या निमित्ताने तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या धर्मपत्नी याही उपस्थित होत्या. त्यांचा ही सन्मान यावेळी करण्यात आला. त्यांचा सत्कार ऍड सुप्रिया गिरी यांनी केला. यावेळी लोकशाही पत्रकार संघाचे मराठवाडा कार्याध्यक्ष आत्माराम वाव्हळ, शिवप्रसाद सिरसाट, अविनाश कुलकर्णी,
आदी उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …