06/09/25

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

बीड दि.३१(प्रतिनिधी)- ह.भ.प रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज नमस्कार ग्रुप गाझियाबाद यांच्या वतीने दिल्या जाणारा “भारत गौरव सन्मान २०२५ ” या देशातील सर्वोच्च पुरस्काराने बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, इतर मागास प्रवर्ग विकास विभागाचे संचालक दत्तात्रय क्षिरसागर, जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा मेश्राम मॅडम, लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे यांच्यासह मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
जामखेड तालुक्यातील मौजे डिघोळ येथील ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज यांच्या साहित्य, संगीत, योग व सामाजिक कार्याच्या ४५ वर्षाच्या प्रदिर्घ साधनेची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारत गौरव सन्मान २०२५ या पुरस्काराने रविवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी बीड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जागतिक भटके विमुक्त दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ह.भ.प. संजय महाराज गित्ते यांना बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडल, शाल श्रीफळ देऊन सन्माननीत करण्यात आले .
यावेळी नॅशनल अनिमल्स वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया चे सदस्य तथा गोसेवक संतोष गर्जे महाराज, लेक लाडकी अभियानाचे बाजीराव ढाकणे, भटक्या विमुक्त विकास परिषदेचे देवगिरी प्रांत संयोजक उमेश जोगी, मातृभुमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय तांदळे, भगवान पवार, बबन गिरी, ओमप्रकाश गिरी,भटक्या विमुक्त जाती परिषद महिला जिल्हा संयोजक माळी, सामाजिक कार्यकर्त्या मनिषा स्वामी, मसानजोगी समाजाचे जातपंचायत पंच हनुमंत मोरे इत्यादी मान्यवर मंडळींची उपस्थिती.
ह.भ.प रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे..

Check Also

प्रत्येक विद्यार्थिनींनी स्वत:चे संरक्षण स्वत:च करायला शिकावे-  दामिनी पथक प्रमुख पल्लवी जाधव मॅडम दामिनी पथकाची जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाला भेटी! विद्यार्थ्यांना कायदेविषयक जनजागृती करून केले मार्गदर्शन

प्रत्येक विद्यार्थिनींनी स्वत:चे संरक्षण स्वत:च करायला शिकावे-  दामिनी पथक प्रमुख पल्लवी जाधव मॅडम दामिनी पथकाची …