06/09/25

नवरी बनून येशील का’ गीताचे जल्लोषात प्रदर्शन  बीडच्या मातीतील कलाकार गणेश भाकरे यांचे सर्वत्र कौतुक

नवरी बनून येशील का’ गीताचे जल्लोषात प्रदर्शन 

बीडच्या मातीतील कलाकार गणेश भाकरे यांचे सर्वत्र कौतुक

बीड दि.४ (प्रतिनिधी):- गणेश भाकरे निर्मित असलेल्या व दिग्दर्शन केलेल्या ‘नवरी बनून येशील का’ या गाण्याचे शनिवार दि.4 मे रोजी सकाळी 9 वाजता जवळपास 150 प्लॅटफॉर्मसह गणेश भाकरे या युट्युब चॅनलवर हे गाणे प्रदर्शीत झाले आहे.

गणेश भाकरे यांनी ग्रामीण भागातून सर्व अडचणींवर मात करत विविध शॉर्ट फिल्म, वेब सिरीजवर आपल्या कलाकृतीतून ठसा उमटवलेला आहे. त्यांचे प्रथमच ‘नवरी बनून येशील का’ हे गाणे शनिवारी सकाळी प्रदर्शीत झाले आहे. त्यांच्या शॉर्ट फिल्म व वेबसिरीजला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. सदरील गाणे हे कोकणातील निसर्गरम्य ठिकाणी शुट झालेले आहे. या गाण्याचा दर्जा देखील उत्तम आहे. सदरील गाणे प्रसिध्द गायक सोनाली सोनवणे आणि केवल वाळंज या गायकांनी गायले आहे. तसेच गाण्याचे संगीत सतीश श्रीनिवास यांनी दिले आहे. गाण्यात अभिनय गणेश भाकरे व केतकी गावडे यांच्यासह अनेक नवोदीत कलाकारांनी केला आहे. बीडच्या पाटोदा तालुक्याच्या मातीतील असलेले गणेश भाकरे यांच्या ‘नवरी बनून येशील का’ या गाण्याचा सध्या महाराष्ट्रात धुमाकुळ चालू असून रसिकांनी या गाण्याचा आस्वाद घ्यावा असे आवाहन गणेश भाकरे यांनी केले आहे.

Check Also

प्रत्येक विद्यार्थिनींनी स्वत:चे संरक्षण स्वत:च करायला शिकावे-  दामिनी पथक प्रमुख पल्लवी जाधव मॅडम दामिनी पथकाची जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाला भेटी! विद्यार्थ्यांना कायदेविषयक जनजागृती करून केले मार्गदर्शन

प्रत्येक विद्यार्थिनींनी स्वत:चे संरक्षण स्वत:च करायला शिकावे-  दामिनी पथक प्रमुख पल्लवी जाधव मॅडम दामिनी पथकाची …