बीड व गेवराई मतदार संघातून बजरंगबप्पा सोनवणे यांना
एक लाखाचे मताधिक्य मिळणार – अॅड.चंद्रकांत नवले
बीड दि.10 (प्रतिनिधी):- बीड लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून अॅड.चंद्रकांत नवले व त्यांच्या सहकार्यांनी बीड मतदार संघातील ग्रामीण भागातील 140 गावे-वाड्या, वस्ती, तांडे व गेवराई मतदार संघातील माळापूरी, धोंडराई, मादळमोही सर्कलमधील गावे पिंजून काढली असून ठिकठिकाणी प्रत्यक्ष गाठीभेटी घेवून बजरंग सोनवणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे. एकंदर सर्वदूर चित्र पाहता ही निवडणूक पुढार्यांना झुगारुन लोकांनी हातात घेतली असून मराठा, धनगर, मुस्लिम, दलित व आठरापगड जातीतील लोकांनी सर्व मतभेद विसरुन घराणेशाही व झुंडशाही झुगारण्यासाठी एका सर्वसामान्य शेतकरी पुत्राला निवडून देण्याचा संकल्प केला आहे. बजरंगबप्पा सोनवणे यांच्यासारखा शेतकरी पुत्राने एका कारखान्याचे दोन कारखाने निर्माण करुन शेतकर्यानां न्याय दिलेला आहे. शेतकर्यांची जाण असलेल्या या पुत्राचा मतदारांनीच प्रचार हाती घेतला असून बजरंग सोनवणे यांना बीड आणि गेवराई मतदार संघातून एक लाखापेक्षा अधिक मतांची लीड मिळणार असल्याचा दावा अॅड.चंद्रकांत नवले यांनी आपल्या ठिकठिकाणच्या प्रचार सभेच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.
अॅड.चंद्रकांत नवले यांनी व त्यांच्या सहकार्यांनी रायमोहा, येवलवाडी, नागरेचीवाडी, हिवरसिंगा, मलकाचीवाडी, शिरापुर धुमाळ, शिरापूर गात, फुलसांगवी, बाजीपूर, जानपीर, जांब, खांबा लिंबा, खालापूरी, आर्वी, पौंडूळ 1,2,3, कमलेश्वर धानोरा, फुलसांगवी, मार्कडवाडी, सा.पिंप्री, फुलसांगवी, केतुरा, उमरद जहाँगीर, सोनगाव, तांदळवाडी भिल्ल, तळेगाव, काकडहिरा, बेलखंडी, पाटोदा, मंजेरी, कर्झनी, पिंपळवाडी, सुर्याचीवाडी, डोकेवाडा, देवर्याचीवाडी, कदमवाडी, चर्हाटा, धुमाळवाडी, मेगळवाडी, जाधववाडी, पालवण, वरवटी, धानोरा, पाली, आहेर वडगाव, कोल्हारवाडी, समानापूर, खांडे पारगाव, नागापूर (बु.), नागापूर (खु.), उमरी, म्हाळस पिंपळगाव, काळेगाव, चिंचोली माळी,म्हाळस जवळा, अंथरवणपिंप्री, नाळवंडी, पोखरी मैंदा व घारवटी, चौसाळा, अंजनवती, लिंबा गणेश, गोलंग्री, बोरखेड, मुळूक, महाजनवाडी सह सर्वदूर गावे पिंजून काढले असून गावागावात मतदारांनी त्यांचे उत्स्फुर्त स्वागत केले असून बजरंग सोनवणे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला आहे. यावेळी त्यांच्या समवेत विलास महाराज शिंदे शिवसेना जिल्हा संघटक, बाळासाहेब मोरे, सुधीरराव सुपेकर, भरत जाधव शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख, बापुराव येळे, सुनील जाधव, प्रभाकर जाधव, पांडुरंग भोसले, मच्छिंद्र शिंदे, आसाराम आमटे, विकास साळुंके, मच्छिंद्र शिंदे, जालिंदर साळुंके, विक्रम साळुंके, हनुमान शेलार, श्रीधरराव उकांडे, शहादेव घोडके, दत्ताभाऊ लंबाटे, रामेश्वर कुंभारकर, बिभीषण चव्हाण, रोहिदास कदम, हरिभाऊ जगताप, मनिष भोसकर, रामचंद्र वीर, लक्ष्मणराव काटे, वडजीराम घाडगे, नामदेवराव शेळके, भगवानराव तिपटे, बबनराव बहीर, अशोकराव पानसंबळ, ईश्वर शिंदे, लक्ष्मणराव घोलप, परमेश्वरराव डोंगर, दादाहरी जोगदंड, त्रिंबकराव आबदार, गणेश बनसोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.