06/09/25

धारूर मध्ये मोबाईल टॉवर कोसळले ; पाच जण जखमी खोडस मध्ये वीज कोसळून गोठा जळाला

धारूर मध्ये मोबाईल टॉवर कोसळले ; पाच जण जखमी

खोडस मध्ये वीज कोसळून गोठा जळाला

बीड दि.११(प्रतिनिधी)-जिल्ह्यातील धारूर तालुक्यात आज दुपारच्या सुमारास वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. यावेळी वादळीवाऱ्यामुळे धारूर शहरातील बीएसएनएलचे टॉवर कोसळे. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाल्याची दुदैवी घटना घडली. याच दरम्यान दुसरीकडे खोडस गावात येथे वीज कोसळल्याने गोठा जळाला या मध्ये शेतकऱ्याचे मोठं नुकसान झाले. सुदैवाने या दोन्ही घटनेमध्ये जिवितहानी झाली नाही.
या बाबत अधिक माहिती अशी की आज शनिवारी ( दि. ११ ) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास धारुर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह
जोरदार वादळीवारा झाला. या वादळी वाऱ्यासमवेत हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. या दरम्यान वादळी वाऱ्यामुळे धारुर शहरातील संभाजीनगर झोपडपट्टी मधील शिकलकरी समाजाच्या घरावर बीएसएनएलचे मोबाईल टॉवर पडले, यामध्ये योगेंदरसिंग ( वय २५ वर्ष ) गंगा कौर ( वय २२ वर्ष ), राधा कौर ( ८ वर्ष ), दस्मित कौर ( ५ वर्ष ), पुनम कौर ( ६ वर्ष ) असे पाच जण जखमी झाले आहेत. यातील चौघा जखमींना अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरीकडे याच तालुक्यातील खोडस गावात साडेचार वाजण्याच्या सुमारास शेतकरी भास्कर नरहरी लाखे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावर वीज कोसळली. यात नारळाच्या झाडासह जवळच असलेल्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली. या आगीत नारळाचे झाड जनावरांचा गोठा आणि गोठ्यातील इतर साहित्य जळून खाक झाले. यावेळी गोट्याला आग लागताच तातडीने या गोठ्यात असणारी वासरे सोडून दिल्याने मोठं नुकसान टळले आहे.
या दोन्ही घटनेमध्ये जीवित हानी झाली नाही.

 

 

 

 

 

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …