पंकजाताई मुंडेंच्या विजयावर
शिक्का मोर्तब करा:पप्पू कागदे
बीड दि.१२( प्रतिनिधी)-
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या हयातीत जातीपातीचे राजकारण न करता सर्व समावेशक भूमिका घेऊन सर्व जाती धर्मातील वंचित घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याचे राजकारण करुन बीड जिल्ह्यातची एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली होती. त्यांच्याच वारसदार पंकजाताई गोपीनाथ मुंडे भाजप व मित्र पक्षाच्या बीड लोकसभा उमेदवार म्हणून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत.
बीड लोकसभा मतदार संघात विरोधकांकडून जाती पातीचे राजकारण करण्यात येत आहे.विरोधकांच्या भूलथापांना व आमिषाला बळी न पडता,भाजप व रिपाइं मित्र पक्षाच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी रिपाइंचे जिल्हा पदाधिकारी,सर्व तालुका अध्यक्ष, महिला आघाडी पदाधिकारी,युवक आघाडी पदाधिकारी, व कार्यकर्ते यांनी मतांचा डोंगर उभा करुन, 13 मे रोजी मतदानरुपी साथ देवून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी पंकजाताई मुंडेंच्या विजयावर शिक्का मोर्तब करावा असे आवाहन युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केले आहे.